Ad will apear here
Next
अनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग तीन
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्याची ओळख नव्या पिढीला होण्याच्या उद्देशाने पुण्यातील ‘रिव्हर्ब प्रॉडक्शन्स’ने ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचे ध्वनिनाट्य रूपांतरण केले आहे. ते ऑडिओ बुकगंगा वेबसाइटवरून मोफत ऐकता येणार आहे. या ध्वनिनाट्याचा तिसरा भाग आता प्रसिद्ध झाला असून, त्यात काय ऐकता येईल, त्याबद्दलची ही माहिती...
............
सन १९०१ : मॅट्रिक परीक्षेनंतर, यमुनामाईंशी विवाह झाल्यानंतर विनायकराव सावरकर फर्ग्युसन कॉलेजमध्ये पुण्याला पुढील शिक्षणासाठी स्थलांतरित झाले. आपले मानसगुरू आणि दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी इथेच सुप्रसिद्ध आरती रचली. पुण्याबाजूच्या शिवकालीन ऐतिहासिक किल्ल्यांना भेटी देता देता त्यांनी नरवीर तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे इत्यादींच्या कर्तृत्वाचे गुणगान करणारे अनेक पोवाडे रचले. लोकमान्य टिळकांनी ‘दैनिक केसरी’मध्ये ब्रिटिश सरकारविरोधात लिहिलेल्या जळजळीत लेखांचा विनायकरावांच्या मनावर प्रभाव पडला. स्वदेशी कपड्यांचा पुरस्कार आणि परदेशी कपड्यांच्या विषयावरून ब्रिटिश सरकारविरुद्ध उठाव करण्यासाठी विनायकराव सावरकरांनी तरुणांना हाताशी घेऊन पुण्यात परदेशी कपड्यांची जाहीर होळी आयोजित केली आणि ब्रिटिश सरकारला आव्हान दिले. या कृत्याबद्दल त्यांना फर्ग्युसन कॉलेजच्या वसतिगृहातून दंड करून काढून टाकण्यात आले; मात्र लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’तील टीकात्मक लेखनानंतर रँग्लर परांजपे यांनी सावरकरांना पुन्हा भरती करून घेतलं.

लेखक/दिग्दर्शक : माधव खाडिलकर
संगीत : आशा खाडिलकर
निर्मिती : ओंकार खाडिलकर
सहनिर्माते : रिव्हर्ब प्रोडक्शन्स
संगीत संयोजन : आदित्य ओक
ध्वनिसंयोजन : मंदार कमलापूरकर
डिजिटल पार्टनर : स्मृतिगंध
सौजन्य : उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट

(ध्वनिनाट्याचा तिसरा भाग ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. ध्वनिनाट्याच्या पहिल्या दोन्ही भागांच्या लिंक्स खाली दिल्या आहेत. या ध्वनिनाट्याचा चौथा भाग १८ जून २०१९ रोजी प्रसारित होणार आहे. या नाटकाची आणि ध्वनिनाट्याची निर्मितीकथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )




 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZTNCB
Similar Posts
अनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग सात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्याची ओळख नव्या पिढीला होण्याच्या उद्देशाने पुण्यातील ‘रिव्हर्ब प्रॉडक्शन्स’ने ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचे ध्वनिनाट्य रूपांतरण केले आहे. ते ऑडिओ बुकगंगा वेबसाइटवरून मोफत ऐकता येणार आहे. या ध्वनिनाट्याचा सातवा भाग आता प्रसिद्ध झाला असून, त्यात काय ऐकता येईल, त्याबद्दलची ही माहिती
अनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग १० स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्याची ओळख नव्या पिढीला होण्याच्या उद्देशाने पुण्यातील ‘रिव्हर्ब प्रॉडक्शन्स’ने ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचे ध्वनिनाट्य रूपांतरण केले आहे. ते ऑडिओ बुकगंगा वेबसाइटवरून मोफत ऐकता येणार आहे. या ध्वनिनाट्याचा दहावा भाग आता प्रसिद्ध झाला असून, त्यात काय ऐकता येईल, त्याबद्दलची ही माहिती
अनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग १२ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्याची ओळख नव्या पिढीला होण्याच्या उद्देशाने पुण्यातील ‘रिव्हर्ब प्रॉडक्शन्स’ने ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचे ध्वनिनाट्य रूपांतरण केले आहे. ते ऑडिओ बुकगंगा वेबसाइटवरून मोफत ऐकता येणार आहे. या ध्वनिनाट्याचा बारावा भाग आता प्रसिद्ध झाला असून, त्यात काय ऐकता येईल, त्याबद्दलची ही माहिती
अनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग पाच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्याची ओळख नव्या पिढीला होण्याच्या उद्देशाने पुण्यातील ‘रिव्हर्ब प्रॉडक्शन्स’ने ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचे ध्वनिनाट्य रूपांतरण केले आहे. ते ऑडिओ बुकगंगा वेबसाइटवरून मोफत ऐकता येणार आहे. या ध्वनिनाट्याचा पाचवा भाग आता प्रसिद्ध झाला असून, त्यात काय ऐकता येईल, त्याबद्दलची ही माहिती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language